- Phone: +91 9767230666
- 24x7 Emergency Hospital
- silverbirchhosp@gmail.com
सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. आणि अर्हम कला,व वाणिज्य महाविद्यालय कॅम्प,पुणे यांच्या वतीने बुधवार,दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा,गोऱ्हे बु. येथे लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीर,सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये मुलांना होणाऱ्या आजारांबाबत तपासणी घेण्यात आली.तसेच लहान मुलांना ओ.आर.एस. (ORS) चे पाकिटे वाटप करण्यात आले. याला शाळेचे सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विशेषतः शाळेतील लहान मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.याचा आम्हाला खूप अभिमान आहे.आम्ही असेच नागरिकांच्या आरोग्य तपासणी बाबत नेहमी तत्पर राहू.शिबिरात घेण्यात आलेली काही क्षणचित्रे.
गुरुवार दिनांक, 9 जानेवारी 2025 रोजी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. आणि पी.एस.टोल रोड प्रा.लि.
यांच्या वतीने खेड-शिवापूर टोल प्लाझा येथे मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यामध्ये टोल प्लाझा चे वरिष्ठ अधिकारी,सहाय्यक अधिकारी आणि कर्मचारी यांचा अतिउच्च प्रतिसाद पहावयास मिळाला. या शिबिरामध्ये ई.सी.जी.,बीपी,
आणि शुगर याची मोफत तपासणी देण्यात आली. यावेळी काही टिपलेली छायाचित्रे.
सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. आणि सौ. डिंपल दिपक इंगळे ( उपाध्यक्षा – पुणे शहर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ,दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे सिंहगड कॉलेज रोड,आंबेगाव येथे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये इसीजी, बीपी,शुगर आणि सीबीसी या तपासण्या नागरिकांना मोफत देण्यात आल्या.याप्रसंगी श्री. दत्तात्रय जरांडे (उपाध्यक्ष – खडकवासला विधानसभा मतदार संघ) ,श्री.अनिल पवार, सौ. सोनाली चौगुले, सौ.शुभांगी कोंडे, डॉ. अविचल अंबुलकर आदी उपस्थित होते.या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
बुधवार दिनांक,१५ जानेवारी २०२५ रोजी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि पै. अमितभाऊ जांभळे (रुग्णसेवक),श्री.उमेश महाडिक (रुग्णसेवक- रुग्णसेवकरी चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा ,तांभाड आणि मादगुडेवाडी येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात इसीजी, बीपी,शुगर या चाचण्या मोफत देण्यात आल्या.यामध्ये समस्थ ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
आपल्या सिल्वर बर्च हॉस्पिटल मध्ये नवीन आलेल्या तसेच कार्यरत असलेल्या फक्त नर्सेस नव्हे तर सर्व उपस्थितांसाठी वेळेला उपयोगी येण्याजोगी आणि आपत्कालीन समयी उपयुक्त अशी उपचार पद्धती CPR (Cardiopulmonary Resuscitation) म्हणजेच श्वासोच्छवास पुनर्संचयित अथवा कृत्रिम वायुविजन या बद्दल एक रूटीन ट्रेनिंग घेण्यात आली.या मध्ये योग्य असे मार्गदर्शन तज्ञ डॉक्टर आणि इतर तज्ञ मंडळी यांच्या मार्फत देण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभक्तीने सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.
मध्ये साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.राजाभाऊ लायगुडे, मा. श्री बाप्पुसाहेब पोकळे, श्री.किशोर रायकर तसेच सिल्वर बर्च च्या संचालिका डॉ.सौ. रश्मी पाटील मॅडम व सर्व स्टाफ मेंबर्स उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका, लहू बालवडकर सोशल वेलफेअर आणि सनराईस मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ व २५ जानेवारी २०२५ रोजी बालेवाडी हायस्ट्रीट ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ” अटल सेवा महाआरोग्य शिबीर २०२५” या कार्यक्रमात सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. ला सुद्धा सेवा देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री – सहकार व नागरी हवाई वाहतूक आणि आयोजक – श्री लहू गजानन बालवडकर चिटणीस – भारतीय जनता पक्ष,पुणे शहर आदींचा येथेच्छ सहभाग लाभला. यामध्ये पुण्यातील नामांकित रुग्णालय व क्लिनिक यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमात विविध प्रकारच्या तपासण्या व मार्गदर्शन मोफत देण्यात आले होते. सिल्वर बर्च ने ही आरोग्य सेवेमध्ये सर्व आयोजकांसमवेत हातभार लावला आहे.
सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील ICU ( अतिदक्षता विभाग) मध्ये नर्सिंग स्टाफ आणि नवीन रुजू झालेला नर्सिंग स्टाफ यांची रूटीन ट्रेनिंग घेण्यात आली. यामध्ये अतिदक्षता विभागामध्ये होणाऱ्या कार्यप्रणाली तसेच रुग्णाच्या वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या काळजीपूर्वक तपासण्याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये डॉ.प्रणय जैन, डॉ.प्रशांत भावसार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थीत असलेला नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर्स यांचे काही टिपलेले क्षण.
Our Best Medical & Services
© copyright 2023. design & develope by Fox AirComm pvt ltd